राज ठाकरेंच खर नाव स्वरराज अस आहे हे बहुतेक लोकांना माहीत ही नसेल कारण राज यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, बाळासाहेबांचे लहान बंधू श्रीकांत ठाकरे यांचे ते चिरंजीव राज यांच्या मातोश्री मधूवंती ह्या बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या सख्या भगिनी होत्या म्हणून राज आणि उद्धव हे चुलत भाऊ तर आहेच शिवाय ते मावस भाऊ देखील आहेत, राज यांचं बालपण मुंबईच्या दादर भागातच गेले त्यांचं प्राथमिक शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झालं. लहानपणापासूनच कलेची आवड असलेल्या राज यांनी सर जे जे स्कुल ऑफ आर्टस् मधून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं खरं तर याच श्रेय त्यांच्या वडिलांना जाते स्व. श्रीकांत ठाकरे हे एक व्यासंगी संगीतकार होते यामुळे राज यांचं नाव स्वरराज असे ठेवले होते, वडिलांच्या सोबत असताना त्यांनी संगीत विषयाबद्दल बरेच ज्ञान प्राप्त करून घेतलं, शिवाय काकांच्या सहवासात असणारे राज आपल्या काकांप्रमाणेच म्हणजे स्व. बाळासाहेबांप्रमाणेच व्यंगचित्र काढत आज ते प्रसिद्ध व्यंगचित्रकार देखील आहेत, राज यांनी मार्मिक, लोकसत्ता आणि सामना या वृत्तपत्रासाठी अनेक व्यंगचित्र काढली आहेत, एवढंच नाही तर महाराष्ट्रात गूगल वर सर्वात जास्त प्रमाणात सर्च होणारे राज हे एकमेव नेते आहेत म्हणजे राज यांनी स्वतःच दबदबा इंटरनेटवर ही निर्माण केला आहे.
राज हे मराठी तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेतच पण मराठी माणूस हा सर्वात जास्त जर कोणाकडून अपेक्षा ठेवत असेल तर तो माणूस राज ठाकरे आहे, आयुष्यात कधीही हार न मानणारे राज यांनी "मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा" आशी नुसती घोषणाच दिली नाही तर जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न ते उराशी बाळगून आहेत. आज त्यांच्या पक्षाचा केवळ एकच आमदार आणि तो ही त्यांच्यासोबत नसूनही राज यांचा राजकीय नेत्यांवर दबदबा आहे. सहसा राज यांच्या वाकड्यात जायला राजकीय नेते घाबरतातच असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सत्ताधाऱ्यांनाही धडकी भरवतात अशी आज त्यांची ओळख आहे. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे ह्या आहेत त्यांना दोन अपत्य देखील आहेत.
राजकीय जीवन
शिवसेना पक्षातूनच राजकीय प्रवासाला सुरुवात ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळ ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळ ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात. आपली राजकीय कारकिर्द त्यांनी शिवसेनेतच सुरू केली. उमदे प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून राज ठाकरे यांनी स्वतःला समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळवला असे दिसते आहे. शिवसेनेला तरुणांचा बळकट पाठिंबा मिळ्वण्यात राज ठाकरे यांचा वाटा महत्त्वाचा समजला जातो,
उमदे प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून राज ठाकरे यांना समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळत होता यामुळेच शिवसेनेला तरुणांचा बळकट पाठिंबा मिळ्वण्यात राज ठाकरे यांचा वाटा महत्त्वाचा समजला जातो. बाळ ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्रे कोण वाहणार यावर एके काळी राज ठाकरे याच्याकडेच बोट दाखवले जायचे. शिवसेनाप्रमुखांनी कार्यध्यक्षपदी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली त्यामुळे राज ठाकरे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष झाला. राज ठाकरे यांना डावलल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. इ.स. २००६, च्या मार्च महिन्यात शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या कारण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला व काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली. तसेच महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक परिस्थिती सुधारण्याचे व महाराष्ट्रात मराठी भाषेची पत ढळू दिली न जाता तिची उन्नती करण्याचे प्रयत्न करीन, अशा प्रकारचा राज ठाकरे यांच्या सुरुवातीच्या भाषणांचा सूर होता. इथूनच सुरू झाली भावबंदकि मनसे शिवसेना वाद मनसे स्थापन केल्यानंतर मनसे ने 2009 च्या विधानसभा निवडणुकात राज यांच्या पक्षाने प्रचंड मोठ्या प्रमणात यश संपादित केल्याने इतर राजकीय पक्षांची बत्ती गुल करणारी ती एन्ट्री होती
उत्तरप्रदेशी व बिहारी लोकांवरील टीका
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणाऱ्या लोंढ्यांवर लक्ष वेधले, मुंबई अगोदरच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल, असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशी व बिहारी लोकांवर आपला शाब्दिक हल्ला चढवला. त्यांच्या राज्यांतील राजकारण्यांमुळे त्या राज्यात रोजगार निर्माण झाला नाही, आणि त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात. त्यांतील सर्वांत जास्त लोंढा महाराष्ट्रात व मुंबईत येतो. त्या राज्यांच्या नाकर्तेपणाचा महाराष्ट्रातील जनतेने का भुर्दंड भरावा? असा सवाल करत तेथील राजकारण्यांवर टीका केली. लालूप्रसाद व पासवान यांच्या भाषणांचा दाखला देत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा राजकीय आरोपही त्यांनी केला. बाहेरच्या राज्यातील नागरिक महाराष्ट्रात येऊन येथील स्थानिक लोकांच्या नोकऱ्यांच्या संधी कमी करतात. परंतु बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिक महाराष्ट्रात येऊन येथील सामाजिक वातावरणही गढूळ करतात असा आरोप करत, हे नागरिक महाराष्ट्रात येऊन मराठी शिकत नाहीत. त्यांच्याशी बोलताना हिंदीतच बोलावे लागते हा सर्वसामान्य लोकांच्या अनुभव आहे. असे सांगत त्यांनी मराठी भाषिकांची भाषिक अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न केला. जपान, फ्रान्स, जर्मनी या देशातील तसेच तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यातील भाषाप्रेमाचे दाखले देत, ह्या देशांत तसेच राज्यात बाहेरून नागरिक आला तर त्याला स्थानिक भाषा शिकावीच लागते. फक्त, उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिक मराठी भाषा का शिकत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पडझड 2009 च्या निवडणुकात राज यांनी यश मिळवले खरे परंतु ते जास्त काळ टिकून राहिले नाही सुरुवातीचे काही दिवस मनसे आमदारांनी आक्रमकता दाखवली होती. पण ती हळू हळू कमी होत गेली मनसे च्या मजबुतीकरनाला खीळ बसली व राज ही काहीशे निष्क्रिय झाले होते. 2014 मध्ये तर मोदी लाटेत सर्वच वाहून गेलं मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला आणि आता मनसेच काहीच खर नाही असे चिन्ह दिसू लागले. नाशिक महानगरपालिका सुद्धा हातची गेली. मुंबईत केवळ सातच नगरसेवक निवडून आले मनसे संपल्यातच जमा असा लोकांचा समज झाला पण राज ठाकरे हा माणूस हार माननारातला नाही. हे पुन्हा अलीकडच्या काळात दिसून येऊ लागले आहे.
राज ठाकरे यांनी आता खऱ्या अर्थाने पूर्णपणे कमबॅक केलंय. त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न चांगलाच यशस्वी ठरत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणावर राज वेळोवेळी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका करत असतात. लोकांना त्यांच्या बोलण्यात सत्यता जाणवत आहे. त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखतींमधून मोदींना त्यांनी लक्ष केलं आहे. सरकार कस चुकीचे निर्णय बळजबरीने देशातील लोकांवर लादत आहे. हे नेहमी लोकांच्या लक्षात आणून देण्याचं काम राज करत आहेत. हिंदीभाषिक पट्ट्यातील राज्यात भाजपचा पराभव झाला तेव्हा राज यांनी हा पराभव सरकारचा नाही तर अहंकाराचा पराभव आहे. अशी टीका करून भाजपच्या नेत्यांच्या जखमेवर रगडावून मीठ चोळले होते. उत्तर भारतीय महासभेच्या मंचावर जाऊन त्यांच्याच भाषेत त्यांनाच सूनवणारे राज ठाकरें समोर इतर नेत्यांची उंची नगण्य वाटते. भारतातील सर्वच नेते ज्या समाजाच्या मंचावर जातील त्यांची पगडी, फेटा, टोपी घालणारे, मनात नसेल तरी त्या समाजासमोर लाळ घोटणारेच आहेत. त्यामुळे राज ठाकरे सर्वांपेक्षा वेगळ्या उंचीवर आहेत. राज यांचा नाशिक जिल्ह्यातील दौरा त्यांच्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देणारा ठरला. या दौऱ्यात त्यांच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात होती. यावरून मुंबईसह महाराष्ट्र आता राज यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पहात आहे तर मध्यंतरी राज ठाकरे यांच्या पासून दूर गेलेला तरुण वर्ग पुन्हा एकदा मनसेकडे आकर्षित होऊ लागला आहे त्यामुळे "राज साहेब" पुन्हा एकदा "Active" मोड वर सेट झालेत.